Land NA Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/land-na/ महान्यूज 18 Sat, 24 Aug 2024 10:16:10 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 https://mahanews18.krushibatami.com/wp-content/uploads/2024/08/cropped-Mahanews18-1-32x32.png Land NA Archives - महान्यूज 18 https://mahanews18.krushibatami.com/tag/land-na/ 32 32 एनए म्हणजे काय? कश्यासाठी केला जातो जमिनीचा एनए? कसा करावा अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती https://mahanews18.krushibatami.com/land-na/ https://mahanews18.krushibatami.com/land-na/#respond Sat, 24 Aug 2024 10:16:10 +0000 https://mahanews18.krushibatami.com/?p=472 Land NA : सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते.   👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈   या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही ... Read more

The post एनए म्हणजे काय? कश्यासाठी केला जातो जमिनीचा एनए? कसा करावा अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
Land NA : सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर शेतीसाठी केला जातो. पण जमिनीचा वापर बिगरशेतीसाठी म्हणजे औद्योगिक, वाणिज्य किंवा निवासी कारणासाठी करायचा असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते.

 

👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈

 

या प्रक्रियेला म्हणजे शेतीच्या जमिनीचं बिगरशेतीमध्ये रुपांतर करण्याच्या प्रक्रियेला एनए असं म्हणतात. यालाच नॉन अॅग्रीकल्चर किंवा अकृषिक असंही म्हणतात. या रुपांतरणच्या प्रक्रियेसाठी ठरावीक ‘रुपांतरण कर’ आकारला जातो.

याशिवाय, महाराष्ट्रात तुकडेबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे मग तुमच्या जिल्ह्यात तुकड्याचं जे प्रमाणभूत क्षेत्र आहे, त्यापेक्षा कमी क्षेत्राचा जमिनीचा तुकडा खरेदी-विक्री करता येत नाही.

 

तुमच्या बँक खात्यात आले ₹ 2000 प्रूफसहित 100% नवीन लाभार्थी यादी जाहीर

 

तो विकायचा असेल तर त्याचा एनए लेआऊट करूनच तो विकावा लागतो. त्यामुळे मग एनएच्या प्रक्रियेला महत्त्व आहे.

एनए करण्यासाठी अर्ज कुठे करायचा?

जमीन एनए करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज करावा लागतो. यासाठी तहसील कार्यालयात जाऊन तिथं एनएसाठीचा अर्ज घ्यावा लागतो किंवा तुम्ही स्वत: स्वतंत्र कागदावर अर्ज लिहून तो सादर करू शकता.

 

नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; जिल्हानिहाय यादी जाहीर

 

या अर्जासोबत काही कागदपत्रं जोडावी लागतात. यामध्ये सामान्यपणे जमिनीचा सातबारा उतारा, सातबाऱ्याशी संबंधित फेरफार, मिळकत पत्रिका, प्रतिज्ञापत्र, ज्या जमिनीचा अकृषिक म्हणून वापर करायचा आहे, त्या जमिनीचा चतु:सीमा दर्शवणारा नकाशा, संबंधित जागेचा सर्व्हे किंवा गट नंबरचा नकाशा, आर्किटेक्टनं तयार केलेल्या बांधकाम लेआऊटच्या प्रती इ. कागदपत्रांचा समावेश होतो.

या कागदपत्रांसोबतचा अर्ज तहसील कार्यालयात जमा करावा लागतो.

 

लडकी बहीण योजनेचे 3000 रुपये बँक खात्यात २ मिनिटात जमा होणार,करा हे काम

 

महसूल तज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांच्या ‘महसूली कामकाज पुस्तिका’ या पुस्तकात या अर्जासाठीचा नमुना देण्यात आला आहे. त्याप्रमाणे तुम्ही तहसीलदारांकडे कागदपत्रांसहित अर्ज करू शकता.

काय काळजी घ्यायची?

जमीन एनए करण्यासाठी अर्ज करताना तुमची जमीन कोणत्या क्षेत्रात येते आणि त्यासाठी महसूल संहितेतील कोणती कलम लागू होते, यानुसार कागदपत्रं लागतात, असं महसूल तज्ञ डॉ. संजय कुंडेटकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.

 

👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈

 

उदा. जर तुम्हाला गावठाण क्षेत्रापासून 200 मीटरच्या आतील जमिनीचा एनए करायचा असेल, तर जमिनीचा सातबारा उतारा, फेरफार उतारा आणि ग्रामपंचायतीचं गावठाण पत्र ही कागदपत्रं अर्जासोबत जोडायची.

हा अर्ज तहसीलदारांकडे दिला तर ते सांगतील तितका कर भरायचा आणि मग अकृषिक वापराची परवानगी देणारी सनद तुम्हाला तहसीलदारांकडून दिली जाईल.

त्यामुळे मग आपली जमीन कोणत्या क्षेत्रात येते, त्यानुसार एनए करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रं लागतील, याची माहिती तहसील कार्यालयातून घेणे अधिक सोयीचे ठरेल.

 

👉 राज्यात शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल 👈

The post एनए म्हणजे काय? कश्यासाठी केला जातो जमिनीचा एनए? कसा करावा अर्ज? जाणून घ्या संपूर्ण माहिती appeared first on महान्यूज 18.

]]>
https://mahanews18.krushibatami.com/land-na/feed/ 0 472