हे 7 पुरावे नेमके कोणते आहेत, याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.
खरेदी खत म्हणजे जमिनीच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा समजला जातो.
खरेदी खत झालं की ती माहिती फेरफारवर लागते आणि मग सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते.
शेतजमिनीचा सातबारा उतारा हा जमिनीच्या मालकी हक्काचा सगळ्यात महत्त्वाचा उतारा आहे.
गाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.
भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीतमध्ये अशा जमिनी येतात, ज्यांचं हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात, शेतकरीच या जमिनीचा मालक असतो.
भोगवटादार वर्ग-2 मधील जमिनींचं हस्तांतर करण्यावर शासनाचे निर्बंध आहेत, सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनींचं हस्तांतर होत नाही.
तिसऱ्या प्रकारच्या जमिनी या ‘सरकार’ या प्रवर्गात मोडतात. या जमिनी सरकारी मालकीच्या असतात.
चौथ्या प्रकारात ‘सरकारी पट्टेदार’ जमिनी येतात. यामध्ये सरकारी मालकीच्या पण भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी असतात. या जमिनी 10, 30, 50 किंवा 99 वर्षांच्या मुदतीसाठी भाडेतत्वार दिल्या जातात.
आता सरकारनं डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उतारा ऑनलाईन उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली आहे.
त्यामुळे दरवर्षी अपडेटेड सातबारा उतारा काढणं कधीही सोयीस्कर ठरतं.
1880 सालापासूनचे सातबारा,फेरफार व खाते उतारे पहा मोबाईलवर
एखाद्या शेतकऱ्याची जमीन ही वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेली असू शकते.
या सगळ्या गट क्रमांकांमधील शेतजमिनीची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असते.
8-अ उताऱ्यामुळे एखाद्या गावात तुमच्या मालकीची जमीन कोणकोणत्या गटात आहे, त्याची माहिती कळते.
त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्कासाठी 8- अचा उतारा महत्त्वाचा दस्ताऐवज मानला जातो.
महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागानं 1 ऑगस्ट 2020 पासून डिजिटल स्वाक्षरीचा 8-अ उपलब्ध करून दिला आहे.
त्यामुळे दरवर्षी तुम्ही अपडेटेड खाते उतारा डाऊनलोड करू शकता. कसा ते खालील व्हीडिओत पाहा.
1880 सालापासूनचे सातबारा,फेरफार व खाते उतारे पहा मोबाईलवर
फक्त गट नंबर टाकून काढा जमिनीचा नकाशा मोबाईलवर
त्यामुळे जमीन मोजणीचे नकाशे जपून ठेवणं गरजेचं असतं.
या पावत्या एका फाईलमध्ये सांभाळून ठेवल्यास वेळप्रसंगी त्याचा पुरावा म्हणून वापर करता येऊ शकतो.
6. जमिनीसंबंधीचे पूर्वीचे खटले
याचाही वापर जमिनीवर मालकी हक्काचा दावा करण्यासाठी करता येऊ शकतो.