जियो च्या रिचार्ज किमतीत झाले मोठे बदल नवीन रिचार्ज प्लॅन्स किंमती जाणून घ्या August 17, 2024 by Ajay Jio Recharge Plan देशातली सगळ्यात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या जियोने 3 जुलैपासून रिचार्जच्या किंमती 12 ते 25 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने गुरूवारी प्रसिद्धी पत्रक काढून याबाबत माहिती दिली. जियोने जवळपास अडीच वर्षांनंतर मोबाईल सेवेच्या दरात पहिल्यांदाच वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रिलायन्स जियो इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश एम अंबानी यांनी दर वाढवण्याचं कारण सांगितलं आहे. नवीन रिचार्ज प्लॅन्स किंमती जाणून घ्या इथे पहा नवीन किंमती ‘नवीन योजनांची सुरूवात, इंडस्ट्री इनोव्हेशनला पुढे नेण्यासाठी तसंच 5G आणि एआय टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून पर्यावरणपूरक वाढीचा पाठपुरावा करण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे’, असं आकाश अंबानी म्हणाले आहेत. नवीन रिचार्ज प्लॅन्स किंमती जाणून घ्या इथे पहा नवीन किंमती जियोने जवळपास सगळ्याच प्लानच्या किंमती वाढवल्या आहेत. सगळ्यात छोट्या रिचार्जची किंमत वाढून 19 रुपये करण्यात आली आहे, जो एक जीबी डेटा ‘ऍड ऑन पॅक’ आहे. या प्लानची आधीची किंमत 15 रुपये होती. ही वाढ जवळपास 25 टक्के आहे. 75 जीबी पोस्टपोड डेटा प्लानची किंमत 399 रुपयांनी वाढून 449 रुपये होणार आहे. जियोने 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीच्या अनलिमिटेड प्लानची किंमत 20 टक्क्यांनी वाढवली आहे. हा प्लान आता 799 रुपयांना असेल जो आधी 666 रुपयांना मिळायचा. RBI कडून ‘या’ 5 बॅंकेचा परवाना बंद तुमचं खातं चेक करा वार्षिक रिचार्जच्या प्लानची किंमत 20 ते 21 टक्के वाढवण्यात आली आहे. हा प्लान 1,559 रुपयांवरून आता 1,899 रुपये आणि 2,999 रुपयांवरून 3,599 रुपये होईल. तसंच सगळ्या 2 जीबी प्रतिदिवस आणि त्याच्यापेक्षा जास्तच्या प्लानवर अनलिमिटेड 5 जी डेटा उपलब्ध राहिल. नवीन किंमत 3 जुलै 2024 पासून लागू होतील, असं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. नवीन रिचार्ज प्लॅन्स किंमती जाणून घ्या इथे पहा नवीन किंमती