Board Exam Timetable : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मोठी घोषणा केली आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. इयत्ता 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक प्रसिद्धीपत्रक जारी करून माहिती दिली आहे की इयत्ता 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे.
👉 10 वी-12वी परीक्षांचे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षा घेतल्या जातात. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 12वीची परीक्षा दरवर्षी फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात घेतली जाते आणि माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाते.
👉 10 वी-12वी परीक्षांचे वेळापत्रक पाहण्यासाठी इथे क्लिक करा 👈
विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया वेळेवर होणे, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा या मंडळाच्या परीक्षेनंतर आयोजित केल्या जात असल्याने अशा परीक्षांचा अभ्यास करण्यास विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळावा तसेच पुरवणी परीक्षा लवकर घेवून त्याचा निकाल लवकर जाहीर करणे, या बाबींचा विचार करुन सन 2025 ची फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणारी दहावी आणि बारावीची परीक्षा नेहमीपेक्षा 18 ते 10 दिवस आधी आयोजित करण्याचा मंडळाचा मानस असून त्याअनुषंगाने लेखी, प्रात्यक्षिक आणि इतर परीक्षा पुढील तारखांना घेण्याचे नियोजन असल्याचं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.