CashDepositRule

किती रक्कमेसाठी नियम लागू?

नव्या नियमांनुसार आता बँकांमध्ये 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करणे किंवा काढणे यावर पॅन किंवा आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे. 10 मे 2022 रोजी सरकारने या नियमांची अंमलबजावणी करणारी अधिसूचना जारी केली. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) प्राप्तिकर नियम 2022 अंतर्गत नवे नियम तयार केले आहेत. हे नवीन नियम लागू झाल्यानंतर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा केली तर. कोणत्याही बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील एक किंवा अधिक खात्यांमध्ये पॅन आणि आधार कार्ड देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

 

घरबसल्या फक्त ५ मिनिटात काढा तुमचे ड्रायव्हिंग लायसन्स मोबाईलवरून; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

 

ज्यांच्याकडे पॅन नाही ते कसे व्यवहार करणार?

ज्यांच्याकडे पॅन कार्ड नसेल त्यांना दिवसाला 50 हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कोणत्याही व्यवहारात किमान सात दिवस आधी पॅनसाठी अर्ज करावा लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीने बँकिंग कंपनी, सहकारी बँक किंवा पोस्ट ऑफिस यांच्या एक किंवा अधिक खात्यांमधून आर्थिक वर्षात एकूण 20 लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम काढल्यास त्याला पॅन किंवा आधार कार्ड द्यावे लागेल.

 

SBI Bank या बँकेत खाते असेल तर मिळणार 2 लाख रुपये तेही 1 दिवसात बँक खात्यात जमा होणार

 

या गोष्टींची घ्या काळजी

प्राप्तिकर कायद्यानुसार दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी आहे. त्यामुळे जास्त रोखीचे व्यवहार टाळा अन्यथा तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.

दोन लाख रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम स्वीकारण्यास सरकारने मनाई केली आहे. त्यामुळे एका दिवसात तुम्ही तुमच्या जवळच्या नातेवाईकांकडूनही दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम घेऊ शकत नाही.

 

1 मिनिटात चेक करा मोबाईलवरून तुमचा सिबिल स्कोर शून्य रुपयात

 

एका वेळी एका देणगीदाराकडून दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारता येणार नाही, जर कोणी त्याचे उल्लंघन केले तर त्याला मिळालेल्या रकमेएवढा दंड आकारला जाऊ शकतो.

आरोग्य विम्यासाठी रोख रक्कम देऊ नका. जर करदात्याने विमा हप्ता रोखीने भरला तर तो कलम 80 डी वजावटीसाठी पात्र ठरणार नाही.